Mumbai Goa Highway Tanker Accident : टँकर दुर्घटनाग्रस्त, मुंबई-गोवा महामार्ग रात्रभर बंद राहणार

Mumbai Goa Highway Tanker Accident : मुंबई गोवा हायवेवर लांजा तालुक्यातील अंजनारी पुलावर एलपीजी गॅसनं भरलेला टँकर उलटून वाहतूक ठप्प झाली. या टँकरची क्षमता 28 हजार किलो आहे. तसंच अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती रोखण्यात काही प्रमाणात यश मिळालं आहे, पण खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक रात्रभर बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. तसंच तज्ज्ञांचं पथक उरण आणि गोव्याहून घटनास्थळी दाखल होणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola