Shinde Fadnavis Pawar Meet : शिंदे-फडणवीस-अजितदादांची खलबतं, रात्रीच्या बैठकीत काय ठरलं?

Continues below advertisement

राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू आहेत. त्याचसंदर्भातली महत्त्वाची बातमी...

रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांची जवळपास दीड तास बैठक झाली. या बैठकीला मावळचे खासदार श्रीरंग बारणेही उपस्थित होते. दरम्यान ही बैठक सुरू असतानाच रात्री उशिरा फडणवीसही वर्षा वर्षावर दाखल झाले. फडणवीस नागपुरातून थेट वर्षावर दाखल झाले. लोकसभेत महायुतीची एकूणच सुमार कामगिरी लक्षात घेता, येणार्या विधानसभा निवडणूकीच्या अनुशंगाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या होणार्या बैठका या महत्वाच्या मानल्या जात आहेत

हेही वाचा

विधान परिषदेतील 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीसंबंधी उच्च न्यायालयात आज सुनावणी होत आहे. नियुक्त्या मार्गी लावण्याच्या प्रक्रियेत  सरकारने अडथळा निर्माण केल्याचा आरोप ठाकरे गटाने
 जनहित याचिकेतून केला आहे. याचिकेत हस्तक्षेप करण्यासाठी शिवसेनेच्या गोपीकिशन बजोरिया यांनी अर्ज केला आहे. या अर्जाची वैधता न्यायालय ठरवणार आहे. न्यायालयाने मागील सुनावणी वेळी  शिवसेनेच्या बजोरिया यांना खडे बोल सुनावले होते. राजकीय लढाईसाठी कोर्टाचा वापर करू नका, अशी ताकीद दिली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram