Eknath Shinde Delhi Daura : एकनाथ शिंदे आज दिल्लीत, महायुतीचा जागावाटपाचा तिढा दिल्लीत सुटणार

Continues below advertisement

Eknath Shinde Delhi Daura : एकनाथ शिंदे आज दिल्लीत,   महायुतीचा जागावाटपाचा तिढा दिल्लीत सुटणार

मुख्यंमंत्री शिंदे आज रात्री पुन्हा जाणार दिल्लीला,  महायुतीचा तिढा अजून सुटेना   महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागावाटपाच्या चर्चेसाठी दिल्ली जाणार  दुसरी यादी जाहिर करण्याआधी मुख्यमंत्री दिल्लीत अमित शहांसोबत होणार चर्चा  सीएम कोकणातील कार्यक्रम संपवून दिल्लीला जाणार,  अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस आधीच दिल्लीला आहेत   जागा वाटपात अंतिम काही जागांचा तिढा आज सोडवला जाणारा

हे ही वाचा....
तर सईद खान यांना मुख्यमंत्री बोलुन शांत करतील 

पाथरीत तेच तेच चेहरे आता नकोसे झालेत 

अनेकांना विचारल्यानंतर माझ्या आईची उमेदवारी फायनल झाली 

परभणीच्या पाथरीतुन निर्मला विटेवर यांना उमेदवारी दिल्यानंतर राजेश विटेवर यांच्या समोर बंडाचे आव्हान 

पाथरी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने विधानपरिषद सदस्य राजेश विटेकर यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर यांना तिकीट जाहीर केले आहे हे तिकीट जाहीर केल्यानंतर राजेश विटेकर यांच्यासमोर शिवसेनेचे नेते सईद खान यांच्या बंडाचा मोठ आव्हान निर्माण झाले कारण सईद खान यांनी विटेकरांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे मात्र असे असले तरी त्यांनी टीका केली असली तरी मुख्यमंत्री त्यांना बोलतील आणि त्यांना शांत करतील असा विश्वास राजेश विटेकर यांनी व्यक्त केलाय तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघात तेच ते चेहरे लोकांना नकोसे झाले आहेत पक्षात बऱ्याच जणांना विचारल्यानंतर माझ्या आईची उमेदवारी फायनल करण्यात आली असल्याचे राजेश विटेकर यांनी सांगितले राजेश विटेकर यांची नेमकी काय भूमिका आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram