Eknath Shinde :'पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं आता मनोमिलन नाटक सुरू', शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला
Continues below advertisement
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) संभाव्य युतीच्या चर्चेवरून जोरदार टीका केली आहे. 'पूर्वी भाऊबंदगी हे नाटक गाजलं होतं, मात्र आता राज्यामध्ये 'मनोमिलन' नाटक सुरू आहे,' अशा शब्दात शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोपरखळी मारली आहे. अंबरनाथ येथील आनंद दिघे नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. शिवसेनेचे यश पाहून काही लोकांच्या पोटात दुखत असल्याची टीकाही त्यांनी केली. आपण आरोपांना कामाने उत्तर देतो, आरोपांनी नाही, असेही शिंदे यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement