Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचं आवाहन,उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजेला विरोध नको,परंपरेत अडथळा नको
Continues below advertisement
Eknath shinde On Kartiki ekadashi pooja :मुख्यमंत्र्यांचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजेला विरोध नको .. परंपरेत अडथळा नको ..
आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही महाराष्ट्राची समृध्द परंपरा आहे. विठ्ठलाच्या ओढीने लाखो भाविक आषाढीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. एकादशीच्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणे योग्य नाही. त्यामुळे या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. एकादशीला महाराष्ट्रात विठ्ठलनामाचाच गजर व्हायला हवा. सारा परिसर जयघोषाने दुमदुमुदे.
Continues below advertisement