Eknath Khadse UNCUT: भाजप आमदार 'संजय सावकारें'बद्दल खडसेंचं वक्तव्य, चर्चांना उधान ABP Majha
खडसेंचे कट्टर समर्थक राहिलेले भाजप आमदार संजय सावकारेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. भुसावळ नगरपालिकेच्या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात सावकारेंनी रस्ते कामासाठी ३ कोटींचा निधी दिल्याचं सांगताच खडसेंनी तुम्हीही आमचेच आहात असं म्हटलं आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. याचा वेगळा अर्थ निघत असल्याचं लक्षात येताच खडसेंनी वाक्य दुरुस्त केलं आणि भुसावळ शहराचं असल्याचं सांगितलं. त्यामुळे खडसेंना नेमकं काय म्हणायचंय हे तोपर्यंत उपस्थितांना कळालं होतं. त्यामुळे भविष्यात सावकारे राष्ट्रवादीत गेले तर नवल वाटायला नको.
Tags :
Mla Ncp BJP Khadse Bhusawal BJP Charcha Lokarpan Staunch Supporter Sanjay Saavkare Sohalyat Saavkare Road Work.