Maharashtra Wet Drought | तेलंगणात जे झालं ते महाराष्ट्रात का नाही?

Continues below advertisement
परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता मुख्यमंत्र्यांसह राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पिक डोळ्यादेखत वाहून गेलं, घरं पडली, काही लोकांचे बळी गेले, जनावरं दगावली अन् शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. मदत मात्र शून्य. शेजारच्या तेलंगणामध्येही विशेषत: हैदराबादमध्ये पावसाने मोठा हाहा:कार माजवला होता. मात्र तिथल्या सरकारनं लोकांना तात्काळ दिलासा देत मदत केली.  तेलंगणा सरकारसोबत बाहेरील राज्यांकडूनही मदतीची घोषणा केली. तसेच तिथल्या कलाकारांनी देखील मदतीचा हात दिला. महाराष्ट्रात मात्र केवळ सोशल मीडियात दौऱ्यांचे फोटो, पोकळ संवेदनाच दिल्या जात असल्याचं चित्र आहे. ना सरकारनं कुठली मदत केली, ना बाहेरील राज्यांनी कुठली मदत केली, ना अजून कुठले कलाकार या बळीराजाच्या मदतीला आलेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram