Maharashtra Politics: 'मी नैतिकतेने राजीनामा दिला, तुम्ही दिला का?', गिरीश महाजनांना थेट सवाल
Continues below advertisement
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात नैतिकतेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वाद पेटला आहे. 'मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला आहे, आता गिरीश महाजनांवर अनेक आरोप झाले पण त्यांनी राजीनामा दिला का?', असा थेट सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे. गिरीश महाजन यांनी दावा केला होता की, खडसेंनी स्वेच्छेने राजीनामा दिला नव्हता, तर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. यावर उत्तर देताना खडसे म्हणाले की, पक्षाच्या सूचनेनुसार त्यांनी तात्काळ राजीनामा दिला होता. 'मी राजीनामा दिला तेव्हा गिरीश महाजन खूप लहान होते', असा टोलाही त्यांनी लगावला. या संदर्भात महाजनांनी अजित पवारांचा उल्लेख करत, नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे म्हटले होते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement