Eknath Khadse Special Report : तन पवारांच्या राष्ट्रवादीत, मन भाजपात; नाथाभाऊ गोंधळले

Continues below advertisement

Eknath Khadse Special Report : तन पवारांच्या राष्ट्रवादीत, मन भाजपात; नाथाभाऊ गोंधळले

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्टवादी शरद पवार गटातून (NCP Sharad Pawar Group) पुन्हा एकदा भाजपामध्ये (BJP) घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) एकनाथ खडसे यांची भाजपा घरवापसी होईल, अशी चर्चा होती. मात्र आता एकनाथ खडसे यांनी भाजपामध्ये माझा प्रवेश झाला, पण घोषणा झाली नाही, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.  

एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपमध्ये आपला प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती आपण भाजपाकडे केली होती. मात्र, भाजपाकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी भाजपाकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. 

आता भाजपमध्ये राहणे उचित होणार नाही

भाजपामध्ये जाण्याची माझी इच्छा होती. माझ्या काही अडचणी होत्या. त्या मी जयंत पाटील यांना सांगितल्या होत्या. मात्र, भाजपाकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे मला आता माझ्या राजकीय भवितव्याचा विचार करावा  लागेल, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे. जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला. मात्र, त्याला खालील लोकांनी विरोध केल्याने तो जाहीर होऊ शकला नाही, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केलाय. तसेच आता भाजपामध्ये राहणे उचित होणार नसल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादी पक्षातच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram