Khadse Robbery: 'त्या' सीडी आणि पेनड्राईव्हमध्ये काय होतं? Eknath Khadse यांच्या घरातून चोरी

Continues below advertisement
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जळगावमधील घरी झालेल्या चोरीला आता एक नवीन वळण मिळाले आहे. या चोरीमध्ये केवळ सोने-चांदी आणि रोकडच नाही, तर महत्त्वाची कागदपत्रं, एक पेन ड्राईव्ह आणि काही सीडी सुद्धा चोरट्यांनी लंपास केल्याचा खळबळजनक खुलासा खुद्द खडसे यांनी केला आहे. 'आपल्या घरातील चोरीमागे चोरट्यांनी कागदपत्रं आणि सीडी चोरून नेली त्यामागे त्यांचा काय उद्देश होता याचादेखील तपास पोलिसांनी करायला हवा,' असे खडसे यांनी म्हटले आहे. ही कागदपत्रे भ्रष्टाचाराशी संबंधित असून माहितीच्या अधिकारात मिळवली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या चोरीमागे केवळ चोरीचा उद्देश होता की एखादे राजकीय षडयंत्र, या दिशेने तपास करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून सत्य समोर आणावे, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola