Bungalow Politics: विधानसभा अध्यक्ष Narwekar यांच्या बंगल्यावर १ कोटींची उधळपट्टी, 'डागडोजी' की 'राजेशाही थाट'?
Continues below advertisement
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या बंगल्यावरील खर्चावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या रविभवन येथील बंगल्यावर तब्बल १ कोटी ४ लाख रुपयांची उधळपट्टी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) हे डागडुजीचे काम होत आहे. या एकाच बंगल्यावर होणाऱ्या प्रचंड खर्चामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी एकूण शंभर कोटी रुपयांचे खर्च प्रस्ताव प्रस्तावित आहेत. याअंतर्गत विधान भवन, रविभवन, देवगिरी, रामगिरी, राजभवन आणि शंभरहून अधिक इतर गाळ्यांची दुरुस्ती व रंगरंगोटीची कामे केली जाणार आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement