Eid e Milad 2021 : ईद ए मिलादच्या मिरवणुका काढायला सशर्त परवानगी ABP Majha
ईद ए मिलाद निमित्त मिरवणूका काढायला सरकारनं सशर्त परवानगी दिली आहे. मात्र मिरवणुकीदरम्यान ध्वनी क्षेपक, स्वागत मंडप, मंडपातील उपस्थिती याबाबत स्थानिक प्रशासनाचे नियम पाळणं बंधनकारक असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क , सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखून धार्मिक प्रवचन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.