Education Department : शिक्षकांना 'शिक्षक वृद्धी प्रशिक्षण' देणार
Education Department : शिक्षकांना 'शिक्षक वृद्धी प्रशिक्षण' देणार राज्यातील शाळांमध्ये दहावी बोर्डाच्या तोंडी व सायन्स प्रॅक्टिकल ची कामे सुरू आहेत. बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे त्यातच मुंबईतील शिक्षकांना दि २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण दिले जाणार असून या प्रशिक्षणाला विरोध करीत ट्रेनिंग पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई व शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांच्याकडे ही मागणी केली आहे नवीन शैक्षणिक धोरण २०२० अनुषंगाने इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शिक्षकांना "शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण" देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांना नुकतेच खोपोली येथे प्रशिक्षण देण्यात आले आता हे तज्ञ मार्गदर्शक मुंबईतील ४ हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तथापि शिक्षकांना १० वी व १२ वीचे विज्ञान प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, बोर्डाची ऑनलाइन कामे करावयाची आहेत दिनांक १ मार्चपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे त्यामुळे फेब्रुवारी व मार्च महिन्यात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येऊ नये अशी मागणी भाजप नेते अनिल बोरनारे यांनी केली आहे