Bhavana Gawali : सोमवारी चौकशीसाठी हजर रहा, ईडीचे भावना गवळींना समन्स
वाशिमच्या शिवसेनेच्या पाच वेळच्या खासदार भावना गवळी यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर 30 ऑगस्ट रोजी भावना गवळी यांच्या संस्थांवर ईडीनं धाडी टाकल्या होत्या. वाशिम जिल्ह्यातील रिसोड व इतर ठिकाणच्या संस्थांमध्ये झडती घेण्यात आली होती. आता सोमवारी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासंबंधी ईडीने समन्स बजावलं आहे.