शेकाप नेते आणि माजी आमदार Vivek Patil यांची 234 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त : ABP Majha
कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकऱणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीने मोठा दणका बसला आहे. ईडीनं विवेक पाटलांची तब्बल 234 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये कर्नाळा स्पोर्टस अॅकॅडमी आणि अन्य ठिकाणच्या जमिनींचाही समावेश आहे. कर्नाळा बँकेच्या 529 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं पाटील यांना जून महिन्यात ईडीनं अटक केली आहे.