Naveen Chichkar : ED ची मोठी कारवाई, ड्रग्ज तस्कर नवीन चिचकरविरोधात गुन्हा दाखल

Continues below advertisement
ईडीने ड्रग्स तस्कर नवीन चिचकार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नवीन चिचकारवर दोनशे कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप आहे, जो नंतर बाराशे कोटी रुपयांपर्यंत वाढला. या प्रकरणी आर्थिक संबंध आणि मालमत्तेची तपासणी सुरू करण्यात आली आहे. नवीन चिचकार हा मोस्ट वांटेड ड्रग्स सिंडिकेटचा प्रमुख आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे वडील गुरु चिचकार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांना सुसाइड नोट देखील सापडली होती. नवीन चिचकार विरोधात एनसीबीमध्ये अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. भारतातला मोस्ट वांटेड ड्रग्स तस्कर म्हणून त्याची ओळख आहे. ईडीच्या या कारवाईमुळे आणखी कोणाचे आर्थिक संबंध आहेत, हे समोर येणे महत्त्वाचे आहे. ईडीच्या तपासात काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola