Girgaon Kalbadevi Voter ID Fraud : काळबादेवीत सापडले परप्रांतियांचे खोटे व्होटर आयडी

Continues below advertisement
मुंबईतील गिरगाव भागातील काळबादेवी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरुच्या सोसायटीच्या (आता गुलमोहोर सोसायटी) पत्त्यावर १४८ परप्रांतीयांनी अनधिकृतपणे मतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड काढल्याचे उघड झाले आहे. स्थानिक रहिवासी आणि 'आम्ही गिरगावकर' टीमने हे बनावट कागदपत्रांचे प्रकरण समोर आणले. अनधिकृतपणे आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र तयार करण्यात आल्याचे लक्षात आल्यावर पोलीस आणि महापालिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. "जे रस्त्यावर झोपतात त्यांना अस्तित्वात नसलेल्या पत्त्यांवर मीटर, रेशन कार्ड आणि वोटर आयडी कार्ड मिळाले," असे एका सदस्याने सांगितले. या सोसायटीत अस्तित्वात नसलेल्या फ्लॅटचे पत्ते देत आधी विजेचे मीटर मिळवून, मग त्या आधारे पॅन, आधार आणि मतदार ओळखपत्र मिळवण्यात आले. १४८ जणांची तक्रार करण्यात आली आहे, मात्र जवळपास १२०० जण यात सहभागी असल्याचा दावा करण्यात येत आहे. १३७ लोकांच्या मतदार ओळखपत्रांच्या रद्द करण्याच्या प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola