Ed Action Shilpa Shetty : राज कुंद्रांची 97 कोटींची संपत्ती जप्त, शिल्पाच्या बंगल्याचाही समावेश
सलमान शेख
Updated at:
18 Apr 2024 02:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppED attaches Shilpa Shetty Raj Kundras Property : ईडीने आज व्यावसायिक राज कुंद्रा यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी, राज कुंद्रा याची 97 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने आपल्या कारवाईत राज कुंद्रा (Raj Kundra) यांची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) नावावर असलेला फ्लॅट आणि बंगल्यावर जप्तीची कारवाई केली आहे. वर्ष 2021 मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचे नाव समोर आले होते. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्रा याची काही महिन्यानंतर जामिनावर सुटका झाली.