Duplicate Cumin Bhiwandi : भिवंडीमध्ये 7 लाखांचं बनावट जिरं जप्त, धक्कादायक प्रकार उघड

Duplicate Cumin Bhiwandi : भिवंडीमध्ये 7 लाखांचं बनावट जिरं जप्त, धक्कादायक प्रकार उघड

तुम्ही रोज फोडणीत घालता ते जिरं बनावट नाही ना याची खात्री करून घ्या... भिवंडीत पोलिसांनी सात लाखांचं बनावट जिरं जप्त केलंय. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय. शहरात बनावट जिऱ्याची विक्री करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. त्यांच्याकडून ७ लाख १९ हजार ७०० रूपये किंमतीचं जिरं जप्त करण्यात आलंय. ,पोलिसांनी शादाब इस्लाम खान आणि चेतन रमेशभाई गांधी या दोघांना अटक केलीय. बाजार भावापेक्षा अर्ध्या किंमतीत बनावट जिरा उपलब्ध करून दिलं जात होतं. आरोपी चेतन गांधी याने पालघर जिल्ह्यात मनोर इथे जागृती इंटरप्रायझेस नोबेल इंडस्ट्रिअल इस्टेट इथे बनावट जिरा तयार करणारी फॅक्टरी उघडली होती. तिथे बडीशेपचा टाकाऊ हिस्सा, लाकूड यात केमिकल आणि केमिकल मिश्रीत पावडर मिसळून जिरा निर्मिती केली जात होती. हा बनावट जिरा वाशी एपीएमसी मार्केट, भिवंडी, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात हॉटेल, धाब्यांवर विक्रीसाठी पाठवला जात होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola