अजित पवारांच्या कार्यक्रमात दारुड्याची एन्ट्री, दादा म्हणतायत,'दुपारीच चंद्रावर गेलास की काय'
Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी आपल्या भाषणात व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला देत असतात. मात्र आज त्यांच्याच कार्यक्रमात एका दारुड्यानं एन्ट्री केली आणि अजितदादांनी आपल्या भाषणात माझ्या तालुक्यात दारु धंदे नकोत, लोकं दुपारीच चंद्रावर जायला लागलेत असं म्हणत तालुक्यात अवैध धंद्यांवर कारवाईच्या सुचनाही त्यांनी केल्या.