Ghatkopar Accident | घाटकोपरच्या एलबीएस रोडवर कारचा भीषण अपघात, तीन जण गंभीर जखमी

काही वेळापूर्वीच एक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव कारने दुकानाच्या कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये असलेल्या दोन तरुणी आणि एक तरुण नशेत होते. गाडी प्रचंड वेगात होती आणि मुख्य रस्ता सोडून फुटपाथवरील दुकानांखाली झोपलेल्या काही लोकांना चिरडून पुढे गेली. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी कारमधील लोकांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक नागरिकांनी कारमधील व्यक्ती नशेत असल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola