Drumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगा
Drumstick Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगा
बंगालच्या उपसागरात धडकलेल्या चक्रीवादळाचा दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रालाही फटका बसत असल्याचं दिसतंय. राज्यात पावसाच्या धास्तीने शेतकऱ्यांना साठवणुकीतला शेतमाल विकण्याची पाळी आली आहे, तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यात झालेल्या पावसाचा शेवग्याच्या लागवडीला मोठा फटका बसला आहे. शेवग्याच्या शेंगा उष्ण असल्याने थंडीत किरकोळ बाजारात शेवग्याच्या शेंगांना मोठी मागणी असते. पण मागणीच्या तुलनेत सध्या बाजारात आवक कमी झाली आहे. परिणामी किलोमागे शेवग्याला प्रतवारीनुसार 500 ते 600 रुपये किलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांनीही शेवग्याकडे पाठ फिरवली आहे. राज्याबाहेरून शेवगा येत असल्यानं शेककऱ्याचं नुकसान शेवग्याच्या शेंगांना चांगला भाव मिळत असला तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र याचा फायदा होत नसल्याचं सांगण्यात येतंय. सध्या बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये शेवगा येत असल्याचं शेतकऱ्यांना फटका बसल्याचं बारामतीतील शेवगा उत्पादक शेतकरी विष्णुपंत हिंगणे यांनी 'एबीपी माझा'ला बोलताना सांगितलं. विष्णुपंत हिंगणे यांचा चार एकर शेवगा आहे. परंतु यंदाच्या वर्षी पाऊस जास्त पडल्याने फुलगळ तसेच रोगाला बळी पडला आणि त्यामुळे यंदा त्यांचं चार एकरातून सात ते आठ लाखाचं नुकसान झालं असल्याचं हिंगणे सांगतात. पुण्याच्या बाजारसमितीत क्विंटलमागे मंगळावारी 03 डिसेंबर रोजी शेवग्याच्या शेंगांना क्विंटलमागे किमान 5000 रुपयांचा भाव मिळाला. आज मार्केटयार्डात 19 क्विंटल शेवग्याची आवक झाली होती.