Palghar vaccination : पालघर जिल्ह्यात आता ड्रोनद्वारे लसीकरण मोहिम राबवण्यात येणार ABP MAJHA
पालघर जिल्ह्यात आता ड्रोनद्वारे लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे.. पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये उद्या या मोहीमेचा शुभारंभ होणार आहे.. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम आणि लांबच्या कार्यक्षेत्रात ड्रोनद्वारे लस पुरवठा होणार आहे..महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लु इन्फिनीटी इनोवेशन लॅब आणि आय आय एफ एल फाऊंडेशनच्या मदतीने हा अनोखा प्रयोग राबवण्यात येतोय.. या नव्या प्रयोगामुळे वेळेची आणि मनुष्यबळाची बचत होईल..
Tags :
Palghar पालघर ड्रोनद्वारे लसीकरण Drone Vaccination Blue Infinity Innovation Lab IIFL Foundation