Matoshree Drone Rowमातोश्रीवर ड्रोनच्या घिरट्या,पॉडटॅक्सीसाठी MMRDA कडून सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर
Continues below advertisement
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'जवळ ड्रोन उडताना दिसल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. 'हाय सिक्युरिटी झोन असलेल्या 'मातोश्री'च्या परिसरात असे ड्रोन दिसणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे, मातोश्रीवर कोणी टेहळणी तर करत नाहीये?,' असा थेट सवाल दानवे यांनी विचारला आहे. ठाकरे गटाने या ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले. मात्र, या सर्व आरोपांनंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) स्पष्टीकरण दिले आहे. MMRDA कडून पॉड टॅक्सीच्या (Pod Taxi) सर्वेक्षणासाठी रीतसर परवानगी घेऊनच हा ड्रोन उडवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्वेक्षणासाठी ८ ते १६ सप्टेंबरपर्यंत परवानगी देण्यात आली होती, असेही पोलिसांनी स्पष्ट केले, त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement