Tiger Translocation 'आमच्या पोटावर पाय का?',Chanda-Chandni वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा विरोध
Continues below advertisement
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून (Tadoba-Andhari Tiger Reserve) चंदा (Chanda) आणि चांदणी (Chandni) या दोन वाघिणींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात (Sahyadri Tiger Reserve) स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थानिक गाईड आणि जिप्सी चालकांनी तीव्र विरोध केला आहे. 'आमच्या रोजगारावर पाय मारल्यासारखं होईल', असं म्हणत स्थानिक चालक चंदू भोयर यांनी आपली व्यथा मांडली. चंद्रपूरमध्ये वाढलेला मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि सह्याद्रीतील वाघांची संख्या वाढवणे हा यामागील उद्देश आहे. मात्र, या दोन्ही वाघिणी गर्भवती असून त्या या परिसरातील पर्यटनासाठी मुख्य आकर्षण आहेत, असा दावा स्थानिकांनी केला आहे. त्यांच्या स्थलांतरामुळे नवेगाव, अलिझंजा आणि निमडेला या गेटवरील पर्यटनावर आणि पर्यायाने रोजगारावर गंभीर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या वाघिणींनी आजपर्यंत कोणालाही त्रास दिला नाही, त्यामुळे त्यांचे स्थलांतरण थांबवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement