Drone Surveillance: 'कोणतं सर्वेक्षण घरात डोकावण्याची परवानगी देतं?', आदित्य ठाकरेंचा MMRDA ला सवाल

Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ जवळ ड्रोन घिरट्या घालताना दिसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा हेरगिरीचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. 'कोणतं सर्वेक्षण तुम्हाला घरांमध्ये डोकावून पाहण्याची आणि पकडले जाताच तात्काळ उडून जाण्याची परवानगी मिळते?' असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे गटाने या प्रकरणाला सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब म्हटले आहे, तर सत्ताधारी नेत्यांनी हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. या सर्व आरोपांनंतर मुंबई पोलीस आणि एमएमआरडीएने (MMRDA) स्पष्टीकरण दिले आहे. बीकेसी (BKC) आणि खेरवाडी परिसरात पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी (Pod Taxi Project) हे सर्वेक्षण सुरू असून, त्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात आली होती असे त्यांनी सांगितले. या स्पष्टीकरणानंतरही, रहिवाशांना पूर्वकल्पना का दिली नाही, असा प्रश्न विचारला जात असल्याने हा वाद कायम आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola