Special Report Mounted Gun System : DRDO ची 'गेम चेंजर' तोफ, 80 सेकंदात तैनात, 48KM मारा!

भारतीय संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि खाजगी कंपन्यांनी मिळून एक स्वदेशी तोफ विकसित केली आहे. अॅडवान्स आर्टिलरी गन सिस्टम (ATAGS) असे या तोफेला संबोधले जाते, तसेच तिला एमजीएस (MGS) असेही म्हटले जाते. ही तोफ जगातील सर्वोत्तम तोफांपैकी एक मानली जाते. या तोफेची सर्वात महत्त्वाची विशेषता म्हणजे ती 80 सेकंदांमध्ये त्वरित तैनात करता येते आणि 85 सेकंदांमध्ये त्वरित माघार घेऊ शकते. यामुळे शत्रूच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यापासून बचाव करणे शक्य होते. या तोफेत एकूण सहा क्रू मेंबर्स बसतात आणि ते पूर्ण ऑपरेशन करू शकतात. ही तोफ वाळवंट, उंच ठिकाणे अशा कुठल्याही ठिकाणी जाऊ शकते. या तोफेची मारक क्षमता 47 ते 48 किलोमीटरपर्यंत आहे. चाचण्यांमध्ये 46 किलोमीटरपर्यंत यशस्वी मारा झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. गोळा पडल्यानंतर तो सरासरी 54 मीटरचा एरिया डिस्ट्रॉय करू शकतो. ही तोफ एका मिनिटात सहा फायर्स करू शकते. या गाडीचे एकूण वजन 30 टन आहे. यात स्टॅबिलायझर डिझाइन केलेले आहेत, ज्यामुळे फायरिंगचा संपूर्ण लोड जमिनीवर जातो आणि चेसिस किंवा टायरवर कोणताही भार येत नाही. डीआरडीओने ही सिस्टिम टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर प्रोजेक्ट अंतर्गत विकसित केली आहे. आता युजर ट्रायल्स होतील आणि त्यानंतर हे तंत्रज्ञान डेव्हलपमेंट पार्टनरला हस्तांतरित केले जाईल. भारतीय लष्कराला अशा 800 वेहिकलची आवश्यकता आहे. कल्याणीने या तोफेचा वरचा भाग विकसित केला आहे. 'ही गेम चेंजर डिफेन्स मध्ये आहे.' असे या तोफेबद्दल म्हटले जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola