Terror Module घटस्फोटानंतर संबंध नाही, Delhi स्फोटातील Dr. Shaheen च्या पूर्वाश्रमीच्या पतीचा खुलासा

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोट प्रकरणात (Delhi Blast) एका 'डॉक्टर टेरर मॉड्यूल'चा (Doctor Terror Module) पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी फरीदाबादमधून (Faridabad) डॉक्टर शाहीन शाहिदला (Dr. Shaheen Shahid) अटक करण्यात आली असून, तिच्या गाडीतून एके-47 जप्त करण्यात आली आहे. तपासात तिचे महाराष्ट्र कनेक्शन (Maharashtra Connection) समोर आले आहे; तिचा विवाह महाराष्ट्रातील डॉक्टर जफर हयातशी (Zafar Hayat) झाला होता, पण २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या प्रकरणाचे धागेदोरे जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेशी जोडले जात आहेत. 'आमचा २०१२ च्या अखेरीस घटस्फोट झाला, तेव्हापासून माझा तिच्याशी कोणताही संबंध नाही,' असे तिचा पूर्वाश्रमीचा पती डॉक्टर हयात जफरने स्पष्ट केले आहे. घटस्फोटानंतर शाहीन डॉक्टर मुझम्मिलच्या (Dr. Muzammil) संपर्कात आली, ज्याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola