Phaltan Case : अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी
Continues below advertisement
सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते मेहबूब शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर गंभीर आरोप केले आहेत. तपासावर देखरेख ठेवण्यासाठी मनोज कुमार शर्मा यांनी काढलेल्या पत्रावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'संपदाची तक्रार करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील नार्को आणि लाईव्ह डिटेक्टर चाचणी व्हायला पाहिजे, म्हणजे त्यांना कोणी दबाव टाकला हे समोर येईल', अशी मागणी मेहबूब शेख यांनी केली. बीडमधील एका विनयभंगाच्या प्रकरणात एसआयटी (SIT) लावली जाते, मग डॉ. संपदाच्या प्रकरणात निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी का स्थापन केली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. CrPC च्या कोणत्या कलमाखाली देखरेखीखाली तपास करण्याचा अधिकार आहे, हा देखरेखीचा नवीन शोध कुठून लावला, असे प्रश्न विचारत त्यांनी तपासाच्या पद्धतीवर अविश्वास दाखवला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement