Three Language Formula: हिंदीसक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा पाचवीपासून करावी डॉ. नरेंद्र जाधवांचा इशारा

Continues below advertisement
महाराष्ट्रातील त्रिभाषा धोरणावरून सुरू असलेल्या वादावर त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. 'शालेय विद्यार्थ्यांना तिन्ही भाषा सक्तीच्या केल्या तर एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होईल', असे परखड मत त्यांनी मांडले. त्यांच्या मते, अनेक लोकांनी हिंदी भाषा पाचवीपासून सुरू करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे, तर काहींनी ती पहिलीपासूनच असावी असा आग्रह धरला आहे. हिंदीमुळे मराठीवर अतिक्रमण होत असल्याचा एक मतप्रवाह आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रातून हिंदी भाषा लोप पावत चालल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या सर्व मतांचा आदर राखून, सर्वांना सोबत घेऊन समिती आपला अहवाल शासनाला सादर करणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola