Dr. Narendra Dabholkar murder प्रकरणाला कलाटणी देणारी माहिती, साक्षीदाराने गुन्हेगारांना ओळखलं

Continues below advertisement

सामाजिक कार्यकर्ते आणि अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाला कलाटणी देणारी माहिती समोर आलीय. या प्रकरणातील साक्षीदारांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान मारेकऱ्यांना ओळखलंय..  सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनीच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं साक्षीदारांनी न्यायालयात सांगितलं.. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना ओळखणारे दोन्ही साक्षीदार पुणे महापालिकेचे सफाई कर्मचार असून त्यापैकी एक पुरुष तर एक महिला आहे. २० ऑगस्ट २०१३ ला पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.. त्यावेळी हे दोन सफाई कर्मचारी तिथे रस्ता साफ करण्याचं काम करत होते.. दाभोलकर पुलावरून चालत निघाले असताना दुचाकीवरून आलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी दाभोलकरांवर गोळीबार केला.. आणि ते शनिवार पेठेच्या दिशेने पळाल्याचे साक्षीदारांनी न्यायालयात सांगितलं..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram