Dr. Narendra Dabholkar Case : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा
Dabholkar Murder Case Verdict LIVE : डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. तब्बल 11 वर्षांनी प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. याप्रकरणी तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं असून दोन आरोपींना दोषी ठरवलं गेलं आहे. प्रकरणातील आरोपी वीरेंद्रसिंह तावडेवर कट रचल्याचा आरोप होता, परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच, पुनाळेकर आणि भावे विरोधातही आरोप सिद्ध होत नाही, त्यामुळे त्यांनाही निर्दोष ठरवलं जात आहे. कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध होतंय, त्यामुळे दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.