Nashik Sahitya Sammelan : यंदाचं साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षांविना! डॉ जयंत नारळीकर येणार नाहीत!
प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. संमेलनाच्या आयोजकांकडून नारळीकर संमेलनाला यावेत यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले. पण नारळीकरांच्या कुटुंबियांनी प्रकृती आणि आताचे वातावरण या पार्श्वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.