Sangli : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील स्वतःच्या जागेत उभारतोय आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल!

Continues below advertisement

चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांपेक्षा सध्या देशात मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंचे कौतुक होतंय. खेळाचे जेवढे कौतुक होते तेवढे दुसऱ्या कोणत्या  क्षेत्राचे होत नाही, असे मत वल राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलेय. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील विटा-भाळवणी येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती संकुलातील  आखाडा पूजन आणि हनुमानाची मूर्ती प्रतिष्ठापणा समारंभ प्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम,  आमदार अनिल बाबर, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी उपस्थित होते.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram