MIDC Dombivli : डोंबिवलीत उघड्या चेंबरमध्ये पडून एकाचा मृत्यू, कल्याण-शीळ रोडवरील घटना

डोंबिवलीतील कल्याण शीळ रोडवरील टाटा पॉवरजवळच्या गांधीनगर परिसरात एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका इसमाचा मृत्यू झाला. बाबू चव्हाण असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते रस्त्याने चालत असताना अचानक चेंबरमध्ये पडले, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला इजा झाली. स्थानिकांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कल्याण शीळ रोडवर या भागात अनेकदा उघडे चेंबर्स आहेत आणि याबाबत नागरिकांनी यापूर्वीही तक्रारी केल्या होत्या. मात्र, एमआयडीसीने या तक्रारींकडे दुर्लक्ष केले होते. एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे, चव्हाण यांच्या मृत्यूसाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केली आहे. 'एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा' अशी मागणी त्यांनी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola