Chhatrapati Sambhajinagar बालकांना अचानक अशक्तपणा, लुळेपणा GBS संशय;खंबाट वस्तीत तपासणी

Continues below advertisement
साताऱ्यातील फुलंब्री तालुक्यामधील खंबाट वस्ती, पाथरी गावातील तीन बालकांना अचानकपणे अशक्तपणा आणि लोळेपणा आला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. आरोग्य विभागाने खंबाट वस्तीवर तपासणी सुरू केली आहे. विहिरीतील पाण्याचे नमुने आणि पशुधनापासून आजार झाला आहे का, याची तपासणी केली जात आहे. शाळेत जाताना ही तिन्ही बालकं अचानक जमिनीवर कोसळली. त्यानंतर त्यांना संभाजीनगरच्या हेडगेवार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुलांच्या पायांमधील ताकद अचानक गेली आणि त्यांना जागेवरून उठणेही अवघड झाले. यामध्ये एक बालक अडीच वर्षांचे, एक नऊ वर्षांचे आणि एक अकरा वर्षांचे आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही तिन्ही बालकं जीबीएस (Guillain-Barré Syndrome) संशयित असल्याचे सांगितले आहे. जीबीएस हा मज्जा संस्थेशी संबंधित आजार आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्यांच्या पायातील ताकद अचानक गेली. डॉक्टरांनी सांगितले की, हे आजार साधारणपणे व्हायरल फिवरनंतर होणारे असू शकतात, ज्यात गुलमबारे सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome) किंवा पोलिओसारखे आजार असू शकतात, तसेच काही दुर्मीळ आजारही असू शकतात. यासाठी त्यांच्या तपासण्या सुरू आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola