कोरोना रुग्णांच्या उपचारामध्ये डॉक्टरांनी औषधांचा अनाठायी वापर टाळावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Continues below advertisement
मुंबई : कोविड उपचारांमध्ये औषधांचा अनाठायी वापर टाळायला हवा. अतिरेकी औषधांमुळे रुग्णांवर याचे दुष्परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. म्युकरमायकोसीस सारखा आजार याच गोष्टींमुळे होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करताना या गोष्टींचा ध्यानात ठेवाव्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असली तरी धोका टळलेला नाही. आता तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Continues below advertisement