MLC Elections : विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर झालीय. अखिल भारतीय काँग्रेस समितीने पत्रक काढून याबाबत माहिती दिलीय. विधानपरिषदेच्या या जागेसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे, नसीम खान आणि जितेंद्र देहाडे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र आता काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल आहे एकाच जागेसाठी निवडणूक असल्याने महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक फारशी अवघड नाही.