Diwali Special Samarjitsinh Ghatge राजघराण्यात दिवाळी कशी असते?समरजीतसिंह,नवोदिता घाटगेसोबत संवाद
Continues below advertisement
कोल्हापूरमधील कागलच्या घाटगे घराण्याची दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या परंपरांवर एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात समरजितसिंह घाटगे आणि त्यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. 'आईसाहेब बाहेरून कडक पण आतून गोड करंजीसारख्या आहेत, तर चकली कुठून सुरू होते आणि कुठे संपते हे कळणे अवघड आहे,' असं म्हणत समरजितसिंह यांनी घरातील सदस्यांची तुलना फराळाच्या पदार्थांशी केली. राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे असलेल्या घाटगे कुटुंबातील दिवाळीच्या आठवणी, परंपरा आणि राजकीय जीवनातील संतुलन यावर त्यांनी प्रकाश टाकला. ग्वाल्हेरच्या असलेल्या नवोदिता घाटगे यांनी सासरच्या परंपरा कशा जपल्या हे सांगितले, तर समरजितसिंह यांनी आपले सीएचे शिक्षण आणि बालपणीच्या आठवणी सांगितल्या.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement