Diwali 2021 : Solapur मारुती मंदिर परिसर ग्राहकांनी गजबजला, सोलापूरमध्ये दिवाळी खरेदी जोरात

Continues below advertisement

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीला आपल्याकडे पारंपरिक दागिने, अलंकार यांची पूजा केली जाते. पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये चांगलीच गर्दी दिसून येत आहे. सोलापुरातील मधला मारुती परिसर देखील ग्राहकांनी गजबजून गेला आहे. पूजेचे साहित्य, रांगोळी, फुलं, पणत्या, श्रीफळ, पान-सुपारी इत्यादि साहित्याची खरेदी नागरिक करत आहेत. मागील दोन वर्षात कोरोनामुळे निर्बंध होते. यंदा निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत उत्साह असल्याच्या भावना लोक व्यक्त करत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram