Diwali 2021 : दिवाळीची सुरुवात विठ्ठल दर्शनानं; विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट ABP Majha

आज दिवाळीचा पहिला दिवस, यंदा नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आली आहे.. आणि दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करुयात आपल्या सर्वांचं आराध्य दैवत पंढरपुरातील विठ्ठलाच्या दर्शनानं... आज अश्विन अमावस्या अर्थात नरक चतुर्दशी निमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. बीड येथील विठ्ठल भक्त करण हनुमंत पिंगळे यांनी ही आकर्षक फुलांच्या सजावटीची सेवा अर्पण केली आहे.  सजावटीमध्ये फुलांचे पडदे , फुलांच्या पायघड्या , फुलांचे आकाशदिवे आणि पणत्या साकारण्यात आल्या आहेत . विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोळखांबी या ठिकाणी देखील फुलांची आकर्षक सजावट केल्याने विठ्ठल मंदिर फुलांच्या सुवासाने दरवळून निघाले आहे .

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola