Diveagar Suvarna Ganesh Temple : अजित पवारांच्या हस्ते 9 वर्षानंंतर सुवर्णगणेशाची प्रतिष्ठापना

रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगर इथल्या प्रसिद्ध गणपती मंदिरात आज ९ वर्षांनी पुन्हा सुवर्णगणेशाची स्थापना झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ही प्रतिष्ठापना झाली. त्याआधी सकाळी मुखवटा पेटीची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. वाजतगाजत हा मुखवटा मंदिराच्या गाभाऱ्यात आणण्यात आला....९ वर्षांपूर्वी म्हणजेच २४ मार्च २०१२ रोजी दरोडेखोरांनी दोन सुरक्षारक्षकांची हत्या करून सुवर्णमूर्ती आणि सोनं पळवून नेलं होतं.  दरोडेखोरांनी विकलेलं सोनं पोलिसांनी छडा लावेपर्यंत वितळवलं गेलं होतं. कायद्याच्या कचाट्यात अडकलेलं हे सोनं राज्य सरकारकडे सोपवण्याचा निर्णय न्यायालयानं दिला. त्यानंतर मंदिरात पुन्हा सुवर्ण गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा झाला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola