GST चे 17 हजार कोटी रुपये वितरित, महाराष्ट्राच्या वाट्याला 3053 कोटी रुपये
Continues below advertisement
नवी दिल्ली: ऑक्टोबर महिन्यात विक्रमी जीएसटी संकलन (GST collection in October 2021) करण्यात आले आहे. मागील महिन्यात एक लाख 30 हजार 127 कोटी इतकी जीएसटी जमा करण्यात आला. यामध्ये सीजीएसटी 23 हजार 861, एसजीएसटी 30 हजार 421 कोटी आणि आयजीएसटी 67 हजार 361 कोटी रुपये आदीचा समावेश आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 24 टक्के अधिक कर जमा करण्यात आला आहे.
Continues below advertisement