
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याच्या आरोपावरून आज विधानसभेत चांगलाच वाद वाढल्याचं दिसलं. (Aditya Thackeray) सत्ताधारी आणि विरोधकांकडून दिशा सलियान प्रकरणावरून मोठी खडाजंगी सुरु झाली. सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं जात असताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदित्य ठाकरेंच्या बाजूने बोलले आहेत. दिशा सालियान हिचा मृत्यू हा अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी केली आहे. आदित्य ठाकरेंचा या प्रकरणात समावेश असेल असे मला अजिबात वाटत नसल्याचं रामदास आठवले म्हणालेत. मात्र, या प्रकरणार दिशा सालियान (Disha Saliyan) हिच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीवर या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे असल्याचेही रामदास आठवले म्हणाले. (Maharashtra Politics)
काय म्हणाले रामदास आठवले?
दिशा सालियान हिचा मृत्यू हा अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी केली आहे.त्यामुळे या प्रकरणात उध्दव ठाकरे यांचं सरकार असताना चर्चा झाली होती.आणि म्हणून आदित्य ठाकरे यांचा या मध्ये समावेश आहे की नाही याबाबत मला माहिती नाही किंवा आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात टार्गेट करण्याची कोणतीच भूमिका आमची नाही.परंतु दिशा सालियान हिच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीवर या प्रकरणातील चौकशी होणे गरजेचे आहे.या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा समावेश असेल असे मला अजिबात वाटत नाही.यासंदर्भातील चौकशी ही निःपक्षपाती पनाने होणे गरजेचे आहे. शिवाय आदित्य ठाकरे यांना यामध्ये टार्गेट करू नये. असे रामदास आठवले म्हणाले.