Barsu Refinery Project : कोकणातील बारसू रिफायनरीवरुन ठाकरे गटात मतभेद?
रत्नागिरीतील कोकणातील बारसू- सोलगाव रिफायनरी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक होणार आहे. मात्र याप बैठकीपूर्वी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी उद्याोगमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिलंय.. या पत्रात 'आधी स्थानिकांशी चर्चा करावी, आम्ही स्थानिकांसोबत' आहोत असा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय... दरम्यान या बैठकीला विनायक राऊत उपस्थित राहणार नसल्याची माहितीही त्यांनी पत्राद्वारे दिलीये.. सकाळी ११.30 वाजता ही बैठक होणार आहे
Tags :
Konkan Letter Vinayak Raut Ratnagiri Review Meeting Thackeray Group MP In The Presence Of Chief Minister Industries Minister Uday Samant Barsu Solgaon Refinery