Loudspeaker Row : मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन भोंग्यांबाबत अंतिम निर्णय, पण.. : HM Dilip Walse Patil

Loudspeaker Row : नागपूर : "धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यांनी अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. आयबी आणि रॉ यांच्याशीही बातचीत करु. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. निर्णय घेताना परिणामही तपासले पाहिजेत," अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. "परंतु हा निर्णय कधी होणार, 3 तारखेच्या आधी होणार की 3 तारखेच्या नंतर होणार ते मी आज सांगू शकत नाही," असंही ते म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola