Dilip Walse Patil : सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचा राजीनामा, प्रकरणाचा तपास सीआयडी करणार

Continues below advertisement

मुंबई: पोलीस दलावर आपला अभिमान असल्याचं एकीकडे सांगायचे आणि दुसरीकडे त्यांच्यावर अविश्वास दाखवत प्रत्येक केस ही सीबीआयकेडे द्यायची मागणी करायची हे बरोबर नसल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांनी राजीनामा दिला असून या प्रकरणाचा तपास आता सीआयडी करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलं.

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "प्रत्येक  केस ही सीबीआयकडे द्या अशी मागणी करणे हे बरोबर नाही. महाराष्ट्रातील पोलीस दलावर तुमचा विश्वास नाही का? मी कुणाची पाठराखण करणार नाही, परंतु हे संपूर्ण प्रकरण आपल्याला तपासावं लागेल. यामागे कोण आहे, कोण दोषी आहे त्याच्यावर काय कारवाई करायची हे पहावं लागेल."

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram