
Dilip Walse Patil: नितेश राणेंच्या अटकेवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया ABP Majha
Continues below advertisement
भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मिळणार की अटक होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याचवेळी शिवसैनिक हल्ला प्रकरणातील आणखी एक आरोपी मनीष दळवी यांना न्यायालयानं अंतरिम जामीन नाकारला आहे. सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या मनीष दळवी यांनी मतदान करण्यासाठी जामीन देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयानं ती फेटाळली. त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळणार की नाही याबाबत उत्सुकता वाढली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात याबाबत थोड्याच वेळात निर्णय अपेक्षित आहे..
Continues below advertisement
Tags :
Mla BJP Sindhudurg Attack Arrest Nitesh Rane Bail Shiv Sainik BJP Interim Bail Accused Manish Dalvi