Mumbai : महाराष्ट्राकडून देशाला अनोखी मानवंदना, 11 वाजता राज्यात समूह राष्ट्रगीत गायन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र आज अनोखी मानवंदना देणार आहे. आज सकाळी ११ वाजता राज्यभरातले नागरिक एकाचवेळी सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन करणार आहेत. नागरिक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या "स्वराज्य महोत्सवाचे" आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.