Fuel Rates Hike : पुन्हा इंधनवाढीचा भडका उडण्याची शक्यता, Diesel शतकाच्या उंबरठ्यावर
Continues below advertisement
Petrol Price Today on 07 October 2021 : सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel)च्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. देशाच्या राजधानीसह सर्वच प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांनी किमतींचा उच्चांक गाठला आहे. IOCL च्या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, आज पेट्रोलच्या किमती (Petrol price today) 30 पैशांनी वाढल्या आहेत. तर डिझेलच्या किमतींमध्ये (Diesel price today) 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचे दर 103.24 रुपये आणि डिझेलचे दर 91.77 रुपये इतके झाले आहेत.
Continues below advertisement